Tuesday, 25 November 2025

व्यायामाचे प्रकार

 

व्यायामाचे प्रकार

व्यायामाचे महत्त्व Importance of Exercise in Marathi – व्यायामाचे एकूण चार प्रकार आहेत. यामध्ये एरोबिक व्यायाम, अनॅरोबिक व्यायाम, स्ट्रेचिंग व्यायाम समतोल व्यायाम, असे चार प्रकार आहेत.

या चार प्रकारांमध्ये धावणे, चालणे, पोहणे, सायकलींग, दोरी उड्या, जोर बैठका, मैदानी खेळ, स्ट्रेचिंग, पायऱ्या चढणे, उतरणे, वजन उचलणे, योगासने, डान्सिंग, इत्यादी प्रकारचा समावेश होतो.

एरोबिक व्यायाम

व्यायामाचे महत्त्व Importance Of Exercise In Marathi – स्नायूंची गती, हृदयाचे आरोग्य, फुफ्फुसांची कार्य करण्याची क्षमता शरीरामध्ये शक्ती वाढवणाऱ्या व्यायामाला एरोबिक व्यायाम असे म्हणतात.

यामुळे हृदय रक्तवाहिन्याने संबंधित प्रणालींची चालना योग्यरित्या होते फुफ्फुसांचे आरोग्य त्यांची कार्य करण्याची क्षमता उत्तम रित्या सुधारते. चालण्याचा व्यायाम, सायकल चालवणे, दोरी उड्या, जॉगिंग, ग्रुप ऍक्टिव्हिटीज, पोहणे, झुंबा एरोबिक्स, पावर योगा हे काही एरोबिक्सचे प्रकार आहेत.

एरोबिक प्रकारच्या व्यायामामुळे हृदय रक्तवाहिन्यासंबंधीत काही रोग असल्यास, टाईप टू मधुमेह असल्यास, किंवा अति उच्च रक्तदाब असल्यास, पॅरालिसिसचा धोका असल्यास, हे आजार कमी होण्यास मदत होते. अशा व्यायामांमुळे हृदयाचे आपले ठोके नियंत्रित राहण्यास श्वासावरचे प्रमाण योग्य राहण्यास, २० ते ३० टक्क्यांनी सुधारते.

एरोबिक व्यायाम दररोज २० ते ३० मिनिटे आपण करायला हवा .अशा व्यायामामुळे शरीराचे कार्यक्षमता योग्यरीत्या वाढते. म्हणजेच आपण थकता, उत्साही पूर्ण आपले दैनंदिन कार्य करू शकतो. तसेच आपला स्टॅमिना सुद्धा अधिक प्रमाणात वाढतो. हा व्यायाम हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.

अनॅरोबिक व्यायाम

आपल्या शरीरामधील स्टॅमिना, ताकद अर्थात कोणतीही गोष्ट किंवा क्रिया करण्याची आपल्या मध्ये असलेली शक्ती. आपल्यातील ही शक्ती वाढवण्यासाठी जो व्यायाम केला जातो, त्याला व्यायाम म्हटले जाते.

या प्रकारच्या व्यायामांमध्ये जलदरीत्या हालचाली, या प्रकारच्या व्यायामामध्ये जलदरीत्या हालचाली कमी वेळेत कराव्या लागतात. यामध्ये जोरात बैठका मारणे, पुश अप, वेगाने धावणे, वजन उचलणे, इत्यादी प्रकारचा समावेश होतो.

अशा प्रकारच्या व्यायामामुळे आपल्या शरीरामधील जी ऊर्जा आहे, ती कमी वेळामध्ये अधिक प्रमाणात वापरली जाते. या प्रकारच्या व्यायामामुळे मांस पेशी तसेच, आपल्या शरीरामधील हाडे मजबूत अगदी बळकट होण्यास मदत होतात.

या प्रकारच्या व्यायामांमध्ये कॅलरीज ही अधिक प्रमाणात आपल्या शरीरामधून बाहेर पडत असते. जळत असते. त्यामुळे कमी वजन होण्यासाठी, वेट लॉस साठी, अनॅरोबिक व्यायाम हे अतिशय उपयुक्त आहेत.

हा व्यायाम प्रकार करतेवेळी जर हृदयविकाराचा व्यक्ती असल्यास आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हव्या करावा किंवा अशा प्रकारचे व्यायाम करणे टाळलेलेच बरे.

स्ट्रेचिंग व्यायाम

स्ट्रेचिंग मुळे आपल्या शरीरामधील लवचिकता, फ्लॅग्जिबिलिटी राखण्यास मदत होते. त्यामुळे स्नायूंना विशिष्ट प्रकारामध्ये ताण दिला जातो या कारणांमुळेच आपली मांस पेशीही लवचिक अधिक प्रमाणात मजबूत होत मजबूत होते.

त्यामुळे आपण आपल्या शरीराला हवे तसे मोडू शकतो. स्ट्रेचिंग हा वर्कआउट चा एक महत्त्वाचा अत्यावश्यक भाग आहे, परंतु अनेक जण स्ट्रेचिंग करणे टाळून, इतर प्रकारच्या व्यायामावर अधिक भर देतात.

मात्र कोणत्याही प्रकारच्या व्यायामानंतर स्नायूंना ताण देऊन, स्ट्रेचिंगचा व्यायाम करणे हा अत्यावश्यक आहे. अधिक प्रमाणामध्ये तरुण हे त्यांचे स्नायू निरोगी असल्यामुळे, स्ट्रेचिंग करण्यास दुर्लक्ष करतात. परंतु वय वाढल्यानंतर स्नायूंमधील लवचिकता या कारणांमुळे कमी होत जाते.

त्यामुळेच तरुणपणा मध्येच व्यायामादरम्यान स्ट्रेचिंग करणे खूप गरजेचे आहे. जर स्ट्रेचिंग केली नाही तर, उतरत्या वयामध्ये स्नायूत पेटके येणे त्या ठिकाणी दुखणे, स्नायूंच्या दुखापती वाढणे, सांधेदुखी होणे, इत्यादी प्रकारचे धोके वाढू शकतात. त्यामुळे स्ट्रेचिंग करणे अत्यंत गरजेचे आहे.

समतोल व्यायाम

या व्यायाम प्रकारामध्ये एक स्थितीत काही वेळ योग्यरित्या राहून, शरीराचा बॅलन्स अर्थात समतोल साधला जातो. योगासने ही या प्रकारच्या व्यायामांमध्ये असतात.

योगासरांच्या नियमित सराव केल्याने, शारीरिक हालचाली, अतिशय योग्यरित्या कार्यक्षमरित्या कार्य करतात. आपले मसल्स अर्थात स्नायू सक्षम होतात. तसेच प्राणायाम ध्यान धारणा, योगासने, सर्व प्रकारचे मानसिक ताण तणाव दूर करण्यास उपयुक्त ठरतात.

आणखी महत्त्वाचे व्यायाम प्रकार

व्यायामाचे महत्त्व 

सायकलिंग करणे

व्यायामाचे महत्त्व - सायकलिंग केल्यामुळे हृदय, फुफ्फुस, हाडे, मांस पेशी, सांध्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच शरीरामध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

समजा काही कारणास्तव सायकल बाहेर चालवणे शक्य नसल्यास घरच्या घरी किंवा जिम मध्ये आपण व्यायामाची सायकल वापरून वर्कआउट करू शकतो. यामुळे स्नायू बळकट होतात. आपले वजन नियंत्रित राहते.

एक तासाच्या सायकलच्या व्यायामातून जवळपास 500 ते 800 कॅलरीज बर्न करता येतात. तसेच आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी देखील सायकलचा व्यायाम फायदेशीर ठरतो. त्यामुळे हार्ट अटॅक, हायब्लड प्रेशर, पक्षाघात, डायबेटीस यासारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.

No comments:

Post a Comment

  Diet and your immune system Like any fighting force, the immune system army marches on its stomach. Healthy immune system warriors need ...