नियमित व्यायामाचे फायदे
- व्यायामामुळे शरीर निरोगी आणि बांधे सुदृढ बनतात.
- रोजच्या व्यायामामुळे स्नायूंची शक्ती, लवचिकता वाढते.
- हाडे मजबूत व बळकट होतात, त्यामुळे भविष्यात हाडे पोकळ होण्याचा ऑस्ट्रिओ पोरोसिस हा आजार टाळण्यास मदत होते.
- नियमित व्यायामाने सांध्यांची हालचाल योग्यरीत्या होते. त्यामुळे सांधिवात, गुडघेदुखी, यांसारखे आजार होण्याचा धोका कमी होतो.
- शरीरातील चरबीचे प्रमाण नियंत्रित राहते.
- शरीराच्या चयापचायच्या गतीमध्ये सुधारणा होते.
- हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
- व्यायामामुळे शरीर मजबूत होते, बलाची वाढ होते, पर्यायाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते.
- नियमित व्यायामाने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
- मानसिक तणाव कमी होतो.
- मन ताजेतवाने प्रसन्न बनते.
- व्यायामामुळे तुमचा मूड सुधारतो आणि नैराश्य चिंता आणि ताण तणाव कमी होण्यास मदत होते.
- व्यायामामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते, तसेच स्मरणशक्ती ही वाढते.
- व्यायामामुळे आळस नाहीसा होतो. झोप व्यवस्थित लागते. कार्य करण्याची स्मृती मिळते, तसेच आत्मविश्वास सुद्धा उंचावतो.
- उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार या सर्व विकारांपासून व्यायामामुळे आपल्या सुटका मिळते.
व्यायामाचे काही महत्त्वाचे नियम
- व्यायाम करतेवेळी सकाळची वेळ निवडावी. सकाळच्या वेळात व्यायाम अतिशय उत्तम व प्रसन्नतेने तुम्ही करू शकता.
- व्यायाम करतेवेळी रिकाम्या पोटी व्यायाम करणे, केव्हाही उत्तम आहे. यामुळे तुम्हाला अधिक प्रमाणात थकवा जाणवणार नाही व अगदी सहजरित्या तुम्ही व्यायाम करू शकता.
- खाल्ल्यानंतर किंवा जेवणानंतर लगेच व्यायाम करू नये. यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो व व्यायाम सुद्धा योग्यरित्या होणार नाही.
- उन्हाळ्यामध्ये व्यायामाचे प्रमाण हे कमी प्रमाणात असावे, तर थंडीमध्ये व्यायामाचे प्रमाण हे अधिकरित्या असावे. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये अधिक प्रमाणात हिट निर्माण होत असते व त्यामुळे आपल्या शरीरातील घटक घामाच्या स्वरूपात बाहेर निघतात व त्यामुळे आपल्याला अधिक थकवा जाणू शकतो, तर थंडीमध्ये आपल्या शरीराला अधिक प्रमाणात हिटची गरज असते. त्यामुळे व्यायाम केल्याने आपल्या शरीरामधील उष्णतेचे प्रमाण वाढवून आपल्या शरीराला एक चांगल्या प्रकारचे आरोग्य प्राप्त होते.
- व्यायाम करण्या अगोदर शरीराला उत्तम प्रकारे तेल लावून घेणे व त्यानंतरच व्यायाम करणे कधीही योग्य असते.
- झोप पूर्ण झाली नसल्यास किंवा शरीरामध्ये अशक्तपणा वाटल्यास, आजारी असल्यास, दीर्घ आजारानंतर तसेच रक्तस्त्राव, मुत्र दोषाचा त्रास इत्यादी त्रास होत असल्यास, श्वसना दरम्यान कुठला त्रास होत असल्यास, अंग दुखत असल्यास व्यायाम करणे टाळावे.
No comments:
Post a Comment