मनुष्य तेव्हा सुखी राहू शकतो, जेव्हा त्याचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त असते. स्वस्थ शरीरासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
एक निरोगी शरीर प्राप्त करण्यासाठी, व्यायामाचे महत्त्व भरपूर आहे. नियमित व्यायाम केल्याने, शारीरिक सुखासोबत मनुष्याला मानसिक संतुष्टीची प्राप्ती होते. कारण व्यायाम केल्याने त्याचे मन प्रफुल्ली, उत्साह पूर्ण आणि आनंदी राहते.
आरोग्य ही संपत्ती आहे. व्यायामाने खूप सारे लाभ होतात. व्यायाम केल्याने मांसपेशी मजबूत होतात, शरीरातील रक्तस्त्राव सुरळीत होतो, व्यायाम केल्याने शरीरात प्रफुल्लता वाढते.
नियमित व्यायाम करणारा व्यक्ती प्रसन्न राहतो. व्यायाम प्रत्येक दिवशी नियमित पद्धतीने करायला हवा. पुरुषांसोबत महिलांनाही व्यायामाचे महत्त्व समजावून नियमित व्यायाम करण्यास प्रेरित केले पाहिजे. आज विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे खूप सारी नवीन नवीन साधने विकसित झाली आहे. या साधनांमुळे मनुष्याचे श्रम कार्य कमी झाले आहेत. त्यामुळे मनुष्यांमध्ये आळस वाढत आहे व तो व्यायामाकडे दुर्लक्ष करीत आहे.
आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये व्यायामाचे महत्त्व सांगितले आहे. धार्मिक ग्रंथांची मान्यता आहे की, जर धन गेले तर ते आपण पुन्हा मिळवू शकतो. मनुष्य धना शिवाय जिवंत राहू शकतो, परंतु जर स्वास्थ्य बिघडले तर, आपले संपूर्ण जीवन निरार्थक होऊन जाते. मनुष्याचे शरीर व मनाला शुद्ध करण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे.
व्यायामाचे सर्वात जास्त महत्त्व विद्यार्थी वर्गासाठी आहे. व्यायामाचे कोणतेही दुष्परिणाम नाही, म्हणून विद्यार्थीच नव्हे तर प्रत्येक वयाच्या लोकांनी नियमित व्यायाम करून आपले जीवन सुखी व निरोगी बनवा.
व्यायामाची आवश्यकता
सुरुवातीच्या काळामध्ये ऋषीमुनी आपल्या विद्यार्थ्यांकडून व्यायाम करून घेत असे, या काळामध्ये मानव हा शारीरिक श्रम मोठ्या प्रमाणात करीत असे व तो स्वतःची कामे स्वतः करीत असे.
उदाहरणार्थ शेती करणे, नांगरणे व पाणी नदीवरून आणणे आणि इतर अनेक प्रकारचे कामे करीत असे आणि मुले सुद्धा मैदाना जाऊन मैदानी खेळ खेळत असे, जसे की गिल्ली डंडा, झाडावर चढणे, कुस्ती, इत्यादी. यामुळे नकळत त्यांचा नियमित व्यायाम होत असे, यामुळे त्यांचे हे शरीर सुदृढ व बळकट होत असे.
परंतु जसजशी विज्ञान आणि प्रगती केली आणि तंत्रज्ञान अधिक विकसित होत गेले, त्यामुळे मानवाची अनेक कामे सोपी होऊ लागली. यामध्ये मानवाचे विविध अशी परिश्रमाची कामे यंत्रच करतात, यामुळे आणि आजच्या डिजिटल युगात वाढते कम्प्युटरच्या कामामुळे एका जागी बसावे लागत आहे.
या कामामुळे आता शरीरात कमी प्रमाणात हालचाल होत आहेत. त्यामुळे मानवाचे शरीर दिवसेंदिवस सुस्त होत चालले आहे आणि व्यायामाची कमतरता त्यामुळे मानवाला अनेक प्रकारच्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे.
आजकालची मुलं हे सर्व कामे आपल्या संगणकावर करतात. शिक्षण घेणे, तासंतास मोबाईल वरती व्हिडिओ गेम खेळत बसणे, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत आहे.
याचाच परिणाम म्हणून लहानपणी त्यांची डोळे दुखणे चष्मा लागणे, वजन वाढणे, इत्यादी समस्या आत्ताच्या मुलांमध्ये दिसत आहे. या आजकालच्या सर्व आजारावरती या काळात फक्त एकच उपाय आहे ते म्हणजे व्यायाम. व्यायाम म्हणजे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली होय.
व्यायाम का करावा ?
व्यायामाचे महत्त्व Importance Of
Exercise In Marathi – व्यायामाचे अनेक असे फायदे आहेत, जर आपण सकाळी उठून लवकर फिरायला बाहेर गेलो, तर आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. याव्यतिरिक्त चालल्यामुळे आपल्या शरीरात रक्ताभिसरण योग्य रीतीने होते व पायातील मांस अधिक बळकट होतात. त्यामुळे मानवाचे शरीर अधिक बळकट बनते आणि लवचिक सुद्धा बनते.
नियमित व्यायामामुळे मानवाचा मेरुदंड अधिक लवचिक होतो, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक वेगळी स्फूर्ती निर्माण होते. व्यायामाचे पुष्कळ प्रकार आहेत, यामध्ये चालणे, फिरणे, योगासने, मोठ्याने हसणे, नाचणे, जिम करणे, इत्यादी प्रकार असतात.
व्यायामाचे प्रकारांमध्ये सर्वोत्तम असं सूर्यनमस्कार आहे. या एका व्यायामामुळे आपल्या प्रत्येक अवयवाची योग्य रीतीने हालचाल होते. यावेळी मानवी शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. यामधील सर्वात महत्त्वाचे, व्यायामामुळे मानवाचे आयुष्य वाढते. शरीरातील विषारी घटक सुद्धा व्यायामामुळे कमी केले जाऊ शकतात.
अनेकांनी व्यायामामुळे दुर्मिळ अशा आजारावरती सुद्धा विजय मिळवला आहे. अशा प्रकारे व्यायामाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
जगामध्ये व्यायामाची जनजागृती होण्याकरिता आणि व्यायामाचे फायदे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. जर आपल्या शरीर जर रोगट असेल तर, आपण आनंदाने जगू शकणार नाही म्हणून आपण नियमित व्यायाम केला पाहिजे.
No comments:
Post a Comment